एक अनोळखी मित्र

ना तुला कधी पाहिले,
ना तुला कधी ऐकले,
ना कधी fb वर friend request,
ना कधी insta वर story update केलीस,
ना कधी twitter वर tweet,
ना कधी whatsapp वर dm,
पण केला तो फक्त विश्वासभरभरून विश्वास
But चलता है yaar तेरी मेरी yaari
तो bhadh में जाय दुनियादारी !

म्हणजे बघ ना हे जग किती भारी
ईथे लोक एका मेकाला म्हणतात सोनू तुला माझ्या वर भरोसा नाय काय !
आणि तुझ्या वर अतूट विश्वास दाखवतात 
ईथे लोकांची चूक असेल तर माफी माघता नाही,
पण एकदा तू दिसलास कि बोलत सुटतात
काही चुकल असेल माफ करकाही चुकल असेल  माफ कर,
आमच्या इच्छा तर जशा D - mart  मध्ये ५०ची ऑफर,
ना कधी अर्धविरामना कधी पूर्णविराम !

पण काय आहेस तू,
तुझे आगमन पाहाण्यासाठी कोकणचे रिझर्व्हशन झाले  फुल्ल
आणि तिकीट काढता काढता बत्ती झाली आमची गुल्ल,
पण तुझा सहवासात मन रमत भारी,
कानात गाड्यांचा हॉर्न नाही,
तर भजनाची होऊ लागली नांदी

एके दिवशी येतोस काय आणि
११ व्या दिवशी जातोस काय
आणि आम्ही म्हणतो ११ दिवस कसे  गेले काय कळलच नाही 

वर्ष भराची शिदोरी घेऊन निघाला तू तुझ्या गावी
आणि आम्ही चाललो सोडून आमची गावाकडची माती

तू गेला तुझ्या गावी आणि शाळा झाली  सुरु
आणि आता daily routine ची वाजू लागली घंटी
आता घड्याळ्याच्या काठ्या वर चालू लागलो आम्ही

पण काय रे दोस्ता
किती तू कंज्जुस
ना येताना “Hi” ना जाताना “Bye”
पण करणार तरी काय
तुला जाताना पाहून डोळे होतात  ओले
आणि आम्ही म्हणत राहिलो
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या,
पुढच्या वर्षी लवकर या !



-रिया रवींद्र राऊळ 






P.C. Riya Ravindra Rawool



Comments

Post a Comment

Popular Posts