३६५ दिवसांची डायरी
वर्ष म्हणजे ३६५ दिवसाचे
चक्र असते,
तर वर्ष म्हणजे पृथ्वीची सूर्या भोवती प्रदक्षिणा असते
वर्ष म्हणजे चंद्राच्या
कलांची Cycle असते,
तर वर्ष म्हणजे सणांची नांदी असते
वर्ष म्हणजे एक तारीख असते,
तर बाकी तारखांसाठी phone असतो
पण आपल्यासाठी वर्ष म्हणजे फक्त 31st ची पार्टी असते…
वर्ष म्हणजे ३६५ दिवस सैनिकांनी सिमेचे केलेलं
सौरक्षण असते,
तर वर्ष म्हणजे त्या सैनिकांचा त्याग असतो
वर्ष म्हणजे Valentine day चा दृष्टीकोन बदलणारा असतो,
तर वर्ष म्हणजे Air Strike असते
वर्ष म्हणजे
काश्मीर धर्तीवरील स्वर्ग असतो
जो आपलाच असून आपल्याला भेटायला वेळ लागतो
वर्ष म्हणजे सरकारच बनणं व बिघडणं असत,
पण आपल्यासाठी वर्ष म्हणजे फक्त 31st ची पार्टी असते…
वर्ष म्हणजे Troll असतो,
चांगला गोष्टींकडे बघण्याचा
वाईट दृष्टीकोन असतो
वर्ष म्हणजे झाडांचं तुटणं असत,
तर वर्ष भरात एक सुध्दा झाड लावणं नसत
वर्ष म्हणजे पाऊस असतो,
जो नसून असल्या सारखा असतो
पण आपल्यासाठी वर्ष म्हणजे फक्त 31st ची पार्टी असते…
वर्ष म्हणजे आपल्यासाठी Hash tag आणि Insta story असतात,
तर वर्ष म्हणजे कोणाचीतरी Life Turning Story असू शकते
वर्ष म्हणजे सुख दुःख ह्याच संतुलन असत,
कारण ते नसलं तर आयुष्य निर्जिव
असत
वर्ष म्हणजे धनुष्य बाण असतो,
कोणाचा बाण लागतो तर कोणाचा लागतच नाही
वर्ष म्हणजे पोटा पाण्या साठी केलेली पायपीट असते,
पण आपल्यासाठी वर्ष म्हणजे फक्त ३१ ची पार्टी असते…
असो संपले ते
वर्ष संपले ते १२ महिने आणि संपला तो ३६५ दिवसाचा सुख दुःखाचा प्रवास,
आता पासून Whatsapp Msg करायला आपण मोकळे
म्हूणन तर आपल्यासाठी वर्ष म्हणजे फक्त 31st ची पार्टी असते,
कधी नाही पाहिलेली ३६५ पानांची डायरी असते…
-रिया रवींद्र राऊळ
-रिया रवींद्र राऊळ
छान लिहिलय...��������
ReplyDeleteधन्यवाद...😃
Delete