संपले ते दिवस
संपले ते दिवस, उरल्या फक्त आठवणी
झाला सगळं डिजिटल आणि बदलो आम्ही
पहिला डाव देवाचा,
पण माझी Bat माझी पहिली Bating ने झाला घोळ
१०, २०, ३० च्या १०० च्या भीतीला नाही कसला तोड,
मामा च पात्र हरवलं, ते मला कधी सापडलंच नाही,
छत्रीच घर तुटलं ते कधी बांधता आलं नाही
लपाछपीचा धप्पा आणि आटली बाटली फुटलीचा
आवाज होता भारी,
आवाज होता भारी,
पकडापकडी , कबड्डी ची झटापट वेगळी
आणि बघता बघता, माझ्या सोनसाखळीची साखळी
झाली खोल अन मोठी
झाली खोल अन मोठी
पण आता,
संपले ते दिवस ,उरल्या फक्त आठवणी
झाला सगळ्याच Upgraded
Version आणि बदलो आम्ही
Version आणि बदलो आम्ही
इथे Bating, Bowling,
Fielding करणारी मी,
चारही बाजूने Ludo, Carrom खेळणारी मी
तेव्हा लपाछपी मधे नवा भिडू नवा राज्य चा व्ह्याच आनंद,
पण इथे नवे भिडू तर येता रोज पण राज्य घेणारी फक्त मी
आता Train च्या handle सोबत
खेळावी लागते पकडापकडी,
खेळावी लागते पकडापकडी,
कोसळतो रोज पत्त्यांचा बांगला पण सावरता येत नाही
का तर संपले ते दिवस,उरल्या नाही आठवणी,
गेले सर्व सोडून ,कि उरले फक्त काही
डोंगर का पाणी मधले
डोंगरा सारखे आई बाबा आणि पाण्या सारखं जग
संपला तो विश्वास आणि उरली फक्त आश्वासन
का कोणास ठाऊक माझ्या सोनसाखळी झाली पोकळ
का तर संपले ते दिवस, संपल्या सगळ्या आठवणी
सोनसाखळी चे हात झाले कमी कि उरलंच नाही कोणी
आता रोजचा कट्ट्याचा झाला Whats app वर ग्रुप,
आणि रोजच्या भेटी झाल्या विडिओ कॉल चे Booth
कारण संपले ते दिवस,उरल्या फक्त आठवणी,
भवऱ्याचा झाला Beyblade आणि संपलाय सगळ्या गोष्ठी
आता लगोरी सारखं सावराव लागत आयुष्य,
कागदाच्या विमाना सारखी घ्यावी लागते भरारी
म्हणून तर होते ते दिवस छान आणि गोड
पण आता काय,
संपले ते दिवस ,उरल्या फक्त आठवणी
Comments
Post a Comment