आता मला काही घरात बसवेनः


(Don't translate this page. It's a Marathi poem, has to be read in Marathi. )

Lockdown आणि Quarantine ह्या शब्दांचा आला आता कंटाळा
देव जाणे कधी माझ्या Dictionary तून होणार ह्यांचा खात्मा
रोजच्या लोकलची सवय झाली इतकी
कि गर्दीतनं मार्ग काढून बाहेर पडण्याची मजाच हरवली
बसच्या handle वर उरला नाही विश्वास
कारण त्याच्यावर नसेल ना कोरोनाच वास
म्हूणन तर देवा ह्या कोरोनाला घेऊन जाना
कारण आता मला काही घरात बसवेनः

२६/११ पहिला , २६ जुलै पहिला ,उरी आणि पुलवामा पण अनुभवला
पण आता युद्धासाठी शत्रूच अदृश्य झाला
अदृश्य शत्रू सोबत झाल आता युद्ध सुरु, माघे फिरण्यात अर्थ नाही
पण ह्या युद्धासाठी मला बळ नाही तर थोडा संयम देशील ना
कारण आता मला काही घरात बसवेनः

पण इतक्या ह्या भयानक प्रसंगी
दिवस रात्री अदृश्य शत्रूशी लढणारे
Police, Doctor, Nurse, Scientist ह्यांना माझा सलाम
पण तरी काही लोकांना कळात कसा नाही
असा प्रश्न पडतो मला फार
असो त्यांना थोडी बुद्धी देशील ना
कारण ह्या थोर लढवय्यांना थोडा तरी आराम मिळू देना 
म्हूणन तर देवा ह्या कोरोनाला घेऊन जाना
कारण आता मला काही घरात बसवेनः

शेती झाली खराब
आधीच त्या शेतकऱ्याला कमी आहे का त्रास
अन्न धान्यच साठा झाला कमी
आणि गरिबांचे होऊ लागले हाल
म्हूणन तर देवा ह्या कोरोनाला घेऊन जाना
कारण आता मला ह्यांचे हाल बघवेना

असं म्हणतात जैसी करणी वैसी भरणी
पण निसर्ग आणि निसर्गाच्या करणी समोर आपली कसली करणी
मान्य आहे मला मी दिला तुला त्रास
पण एकदा तरी मायेने पोटात घेशील का
चूक झाली माफ करशील ना
कारण आता मला काही घरात बसवेनः

पूर्वी घरातून बाहेर पडताना वाटायचं आज घरी पुन्हा येइन ना
पण आता घरी बसल्या बसल्या वाटतं
कोरोना आपल्या पर्यन्त पोहचेल का ?
पूर्वीची Lifeline मला परत दिसेल का ?
पूर्वीचे अनोळखी पण ओळखीचे चेहरे मला परत दिसतील का ?
बिना mask मला परत फिरत येईल का ?
बिना social-distancing मला परत मजा करता येईल का ?
कोरोना वर मात करून परत Road cross करता येईल का ?
आता तरी ह्या  ह्या कोरोनाला घेऊन जाना
कारण आता मला ह्यांचे हाल बसवेनः
कारण आता मला ह्यांचे हाल बसवेनः...

-रिया रविंद्र राऊळ



Comments

Post a Comment

Popular Posts